Home आरोग्य कोल्हापुर येथील कणेरी मठ कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने ५२ गायींचा मृत्यू

कोल्हापुर येथील कणेरी मठ कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने ५२ गायींचा मृत्यू

627
0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी मुत्यू झाला आहे.अचानक घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली.यातील ही ३० गायींवर उपचार सुरू आहेत.श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली होती . प्रदर्शनामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार असल्याचीही माहिती देण्यात आली. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असू तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील ठेवण्यात आली होती . त्यासाठी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येतील. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here