Home इतर बसमध्ये चढताच चालकाचा मृत्यू…!

बसमध्ये चढताच चालकाचा मृत्यू…!

635
0

मराठवाडा साथी न्यूज

सोयगाव : येथील आगाराचे चालक नागोराव मेश्राम (४८) हे कर्तव्य बजावण्यासाठी आगारात आले होते. बसमध्ये चढत असतांना त्यांना अचानक हदयविाकराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरुवार दि.१० रोेजी सोयगाव आगारात सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

चालक नागोराव मेश्राम हे सोयगाव येथून धुळे येथे बस नेण्यासाठी सकाळी ९ वाजता आगरात आले होते. बस क्रमांक एम-एच-२० डी-०५८२ सोयगाव ते धुळे बसची नियंत्रण कक्षात नोंदही केल्यानंतर चालकाच्या कॅबिनमध्ये बसताच त्यांना हदयविकाराचा झटका आल्याने ते जागेवरच बेशुध्द पडले. कर्मचारी व नागरिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पाचोरा जि.जळगाव येथे हलविण्यात आले. त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here