Home महाराष्ट्र “…. हा विश्वास आहे” – रोहित पवार

“…. हा विश्वास आहे” – रोहित पवार

506
0

भंडारा : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.मात्र या अग्नितांडवात १० नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेवरून सर्व राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आता राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल ‘असा विश्वास व्यक्त केला आहे. “भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे”.असे ट्विट त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here