Home देश-विदेश लालूप्रसाद यादव यांना जामीन

लालूप्रसाद यादव यांना जामीन

0

पाटणा । चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी ते दुमका कोषागार प्रकरणात आरोपी असल्यामुळे जेलमध्येच राहणार आहेत.
लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात तीन वेगवेगळ्या केसमध्ये आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादवांना अटक झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र नंतर पुन्हा 23 डिसेंबर 2017 मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेल मध्ये पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here