Home क्राइम क्रिकेटपटू सुरेश रैना,गायक गुरु रंधावासह सेलेब्रिटींवर मुंबईत गुन्हा दाखल…!

क्रिकेटपटू सुरेश रैना,गायक गुरु रंधावासह सेलेब्रिटींवर मुंबईत गुन्हा दाखल…!

500
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा यांना मुंबईत अटक करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच समोर येत आहे. मुंबई विमानतळाजवळील मुंबई ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.यावेळी सुझान खान देखील तेथे उपस्थित असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत क्लब सुरु ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. या क्लबच्या ग्राहकांमध्ये सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये २७ ग्राहकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई एअरपोर्टजवळ असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लब येथे मुंबई पोलिसांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकली. ज्यानंतर क्लबमध्ये असणाऱ्यांची नावे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here