Home क्राइम महिलेचा तोंडात माती टाकून दागिने लुटले

महिलेचा तोंडात माती टाकून दागिने लुटले

288
0

पाचोड/आडुळ [ता पैठण ]:आडुळ येथील शेतात दुपारी झोप घेत असलेल्या महिलेला एक चोरट्याने चाकूचा धाक दाखवत मारहाण केले तसेच आरडाओरडा करू नये म्हणून तोंडात माती टाकून अंगावरील सर्व दागिने लुटून नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सुदर्शन घुगे या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडूळ येथील गणेश जंगले हे गावात रसवंती चालवितात त्यांची पत्नि रुख्मिणीबाई जंगले [वय ४०] या शुक्रवारी शेतात काम करीत होत्या दुपारी लिबांच्या झाडाखाली जेवण झाल्यानंतर त्या झोप घेत होत्या आरोपी सुदर्शन घुगे मोटारसायकलने तेथे आला,कोणी नसल्याचे पाहून त्याने रुख्मिणी बाई याना मारहाण केली तसेच ओरडू नये म्ह्णून तोंडात माती टाकून चाकूचा धाक दाखवत २४ हजार रुपयाचे गळ्यातले व कानातले सोन्याचे दागिने हिसकावून घेतले व कोणाला सांगितल्यास मुलासह सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिली घटने नंतर रुख्मिणीबाईनि पती गणेश यांना फोन करून सगळी माहिती दिली. कुटूंबियांनी भीती पोटी तक्रार नोंदवली नाही मात्र आरोपीचा या लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर जंगले दांपत्यांनी तक्रार नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here