Home क्राइम नागपूर: महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी; मुख्य अग्निशमन अधिकारी पोलिसांच्या...

नागपूर: महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी; मुख्य अग्निशमन अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

3075
0

एका महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी करीत विनयभंग करणारे नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड येथील राजनांदगाव कोतवाली ठाण्याच्या पथकाने त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीची छत्तीसगडमधील अमितशी फेसबुकवरून ओळख झाली व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२१ मध्ये दोघांनीही लग्न केले.

राजेंद्र उचके व तरुणीची अगोदरपासूनच ओळख होती. दोघांमध्ये संवाददेखील होत होता. मात्र १७ जून २०२२ पासून उचकेने अश्लील चॅटिंग करण्यास सुरुवात केली. सोबतच स्वत:चे अश्लील चित्रफिती, छायाचित्र व ध्वनिफितीदेखील पाठविल्या होत्या. तक्रारीनुसार उचकेने तिला शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावरून तरुणीने त्याला जाब विचारला असता त्याने तिला अधिकारी असल्याचे सांगत कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे प्रचंड मन:स्ताप होत असून आत्महत्येचे विचार मनात येत असल्याने तरुणीने राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर उचके यांच्याविरोधात नोव्हेंबर २०२२ मध्ये कलम ५०६ (ब), ५०९ (ब) व आयटी ॲक्ट ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राजनांदगाव येथील पोलीस पथकाचे प्रमुख अजित सिंह राजपूत यांनी तीन दिवसांपूर्वीच उचके यांना अटक केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोला सिंह राजपूत यांच्या नेतृत्वातील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here