Home क्राइम दुचाकीवरुन आलेल्या चोराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न

दुचाकीवरुन आलेल्या चोराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न

255
0
pooja uchit

महाराष्ट्रात अनके मोठया शहरांमध्ये गुन्हे होता असतात या मध्ये पुणे ही मागे नाही.पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हत्या, दरोडा, , चोरी अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. अलिकडेच सोनसाखळी चोरांनी पूर्ण शहरात धुमाकूळ घातला आहे.पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा मोठया प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यातच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात दुचाकीवरुन आलेल्या चोराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.पण तिच्यासोबत असलेल्या 10 वर्षाच्या नातीने चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here