Home देश-विदेश इंडोनेशियातील तरुणाच्या घरावर कोसळला अनमोल ‘उल्कापिंड’

इंडोनेशियातील तरुणाच्या घरावर कोसळला अनमोल ‘उल्कापिंड’

330
0

मराठवाडा साथी न्यूज

इंडोनेशिया : डेली मेलच्या रिपोर्टनुसार जोसुआ हुतागलुंग (वय ३३) उत्तर सुमात्रातील कोलांगमध्ये असलेल्या आपल्या घराजवळ काम करत होता. त्यावेळी त्याच्या घरावर काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज आला.यामुळे फक्त त्याचं घरच नाही तर आजूबाजूची घरंही हादरली आणि त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला.त्याच्या घरावर आकाशातून जणू खजिनाच कोसळला, ज्यामुळे काही मिनिटांतच तो १० कोटी रुपयांचा मालक झाला आहे.

त्याने आपल्या छताकडे बघितले तेव्हा त्याच्या छताला एक मोठ छेद पडला होता. एक मोठा दगड त्याच्या घरावर कोसळला आणि यामुळे जमिनीवर १५ सें.मी.खड्डा झाला.जेव्हा जमिनीतून त्याने हा दगड बाहेर काडला तेव्हा तो खूप गरम होता आणि थोडा तुटलाही होता. या दगडाचे वजन तब्बल २.१ किलोग्रॅम होते.जेव्हा त्याने या दगडाबद्दल संपूर्ण माहिती मिळवली तेव्हा असे लक्ष्यात आले कि,जे छतातून पडलय ते दगड नसून एक दुर्मिळ उल्कापिंड आहे.

या दुर्मिळ उल्कापिंडाची किंमत प्रतिग्रॅम ८५७ डॉलर आहे. रिपोर्टनुसार जोसुआनं खड्डा खणून ही अनमोल उल्कापिंड बाहेर काढला, ज्यामुळे तिच्यावर त्याचा मालकी हक्क होता. या अनमोल दगडाच्या बदल्यात जोसुआला १४ लाख पाउंड म्हणजे तब्बल १० कोटी रुपये मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here