Home छत्रपती संभाजी नगर व्हिप म्हणजे काय हे तुम्हला माहिती आहे का ?

व्हिप म्हणजे काय हे तुम्हला माहिती आहे का ?

263
0

आताच्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांनी सभागृहात हजर राहण्याचा व्हिप अश्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत असतात तुम्हाला व्हिप म्हणजे काय हे माहिती आहे का, राजकीय पक्षांनी संसद किंवा विधीमंडळात ‘व्हीप’ (Whip) जारी केला असं आपण बऱ्याचदा ऐकतो. पण व्हीप जारी करणं म्हणजे नेमकं काय असतं? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या. व्हीपचा चा सोप्या आणि साध्या भाषेतील अर्थ म्हणजे,पक्षशिस्तीचं पालन करणे,असा होतो. संसदेतील व्हीप म्हणजे एखाद्या पक्षाच्या सदस्यांना महत्त्वाच्या मतासाठी उपस्थित राहण्याचा किंवा त्यांनी विशिष्ट पद्धतीने मतदान करण्याचा लेखी आदेश किंवा कामकाजात व्हीप म्हणजे शिस्त होय. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपने करायचे असते.लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान व्हायचे असेल आणि संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबतचा आदेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो.सभागृहांचं कामकाज उंचावण्यासाठी सभापती, अध्यक्ष जसे महत्त्वाचे असतात, तसेच विरोधी पक्षनेते महत्त्वाचे असतात. याशिवाय विविध पक्षांचे गटनेते किंवा प्रतोदही त्या-त्या सभागृहात प्रतिनिधित्व करत असतात. संसदीय कार्यप्रणालीत मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) आणि प्रतोद (व्हीप) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. व्हीपची संकल्पना ब्रिटिशकालीन आहे.

व्हिप चा वापर कसा केला जातो ?
भारतातील सर्व पक्ष त्यांच्या सदस्यांना व्हिप जारी करू शकतात. पक्ष व्हीप जारी करण्यासाठी त्यांच्या सभागृहातील वरिष्ठ सदस्याची नियुक्ती करतात या सदस्याला मुख्य व्हिप असे म्हणतात आणि त्याला अतिरिक्त व्हिपद्वारे मदत केली जाते.

व्हिपचे प्रकार:
१] one line whip:एकदा रेखांकित केला जातो, तो सहसा पक्षाच्या सदस्यांना मताची माहिती देण्यासाठी जारी केला जातो आणि जर त्यांनी पक्षाच्या मार्गाचे
पालन केले नाही तर त्यांना दूर राहण्याची परवानगी दिली जाते.
२] two line whip : त्यांना मतदानादरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश देतो.
३] three line whip: हा सर्वात मजबूत असतो, जो विधेयकाचे दुसरे वाचन किंवा अविश्वास प्रस्ताव यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी वापरला जातो आणि
सदस्यांना पक्षाच्या पंक्तीचे पालन करणे बंधनकारक आहे

आपल्या राजकीय व्यवस्थेत व्हीपचे महत्त्व:
सरकारच्या संसदीय स्वरूपामध्ये, विविध राजकीय पक्षांचे व्हिप हे पक्षांच्या अंतर्गत संघटनेत, विधिमंडळातील एक महत्त्वाचा दुवा असतात. संसद आणि राज्य विधानमंडळांचे कार्यक्षम आणि सुरळीत कामकाज हे व्हिपच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. व्हीप्सला विधिमंडळातील पक्षांचे व्यवस्थापक म्हटले जाऊ शकते

व्हीप बंधनकारक का ?
हा व्हीप त्या-त्या पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो. कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊ शकतेच, शिवाय त्याला पदही गमवावं लागू शकतं. त्यामुळे आपले आमदार खासदार फुटू नयेत म्हणून महत्त्वाच्या राजकीय निर्णयाप्रसंगी राजकीय पक्ष व्हीप जारी करतात

व्हीप’ केव्हा बजावता येत नाही?
भारतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सदस्य (खासदार) किंवा विधानसभेचे सदस्य (आमदार) यांना व्हीप बजावून कोणाला मतदान करायचे याचा निर्देश देता येऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here