Home होम शेतकऱ्यांच्या विजबिलात मिळणार 50 टक्के सवलत!

शेतकऱ्यांच्या विजबिलात मिळणार 50 टक्के सवलत!

395
0

शेतीसाठी वापरलेल्या विजेच्या बिलात सवलत देण्यात येत आहे. मागील थकबाकी चालू वर्षात शेतकऱ्यांनी भरल्यास त्यांच्या बिलाच्या रकमेतून 50 टक्के रक्कम माफ होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. सदरील योजना नेमकी काय आहे? याबाबतची माहिती शेतकऱ्यांना जवळच्या विजवीतरण केंद्रात जाऊन घेता येणार आहे. कृषी विजबिल भरत असतांना मात्र एकूण बिलाच्या अर्धी रक्कम एकदम भरावी लागणार आहे.

विजबिल माफीच्या सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना एकूण बिलापैकी फक्त ५० टक्केच रक्कम एकदम भरावयाची आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम हि कायमस्वरूपी माफ होणार आहे. हि योजना मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे. परत अशी योजना भविष्यात होणे नाही. आपल्याला होत असलेल्या माफीच्या  रक्कमेचा तपशील https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app या लिंकवर बघता येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी योजना पुन्हा नाही -अंबाटकर
कृषी वीज बिलाचा माफीची सदर योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे, यापूर्वी अशी योजना नव्हती व भविष्यातही असणार नाही त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. एकूण बिलाच्या 50 टक्के रक्कम माफ होणार असल्यामुळे मोठ्या रकमेची बचत होऊन आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती परळी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाटकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here