Home अपघात बातमी कृषी महाविद्यालय आवारात खून करून मृतदेह झाडाला लटकवला

कृषी महाविद्यालय आवारात खून करून मृतदेह झाडाला लटकवला

214
0

गोंदिया शहराच्या रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेतील एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळला. दरम्यान तरुणाच्या गळ्यावर जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे बोलले जात आहे.यासंदर्भात रामनगर पोलिसांनी खुनाची नोंद केली आहे. संदीप भाऊलाल चिखलोंडे (29), रा. चांदणीटोला (नागरी), ता. जि. गोंदिया असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागोजागी रक्ताचा सड़ा पडला होता. संदीपचा खून करणारे ओळखीचेच असावेत असा कयास लावला जात आहे. यासाठी रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे प्रत्येकी एक अशा दोन चमू गठित करून आरोपींच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. आरोपी सापडल्यानंतरच या खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here