Home आरोग्य तर वाचू शकला असता त्या १० नवजात बाळांचा जीव…!

तर वाचू शकला असता त्या १० नवजात बाळांचा जीव…!

544
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील १० नवजात बाळाच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरून गेला होता.मात्र,या घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या माहितीनुसार परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे या १० नवजात बालकांचा बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ जाने.रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे १० नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला . या प्रकरणी सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.त्यानंतर आता या समितीने ५० पानांचा अहवाल तयार केला आहे.ज्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली,असे समितीने स्पष्ट केले आहे.

‘यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्यापरिचारिकांच्या कामावर बोट उठविण्यात आले आहे.ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती.तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती,असे परखड मत समितीने नोंदवले असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील दिवसांमध्ये समिती आपला अहवाल हा भंडारा पोलिसांना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाकडून कुणावर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याबद्दल नावे जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.तसेच या प्रकरणी परिचारिका आणि एका सिव्हील सर्जनवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here