Home मुंबई देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच ठाकरेना दिले गिफ्ट

देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच ठाकरेना दिले गिफ्ट

410
0

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील छोट्या धनुष्यबाणाची प्रतिकृती दाखविली होती. तो खरा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेबांना भेट दिला होता, अशी चर्चा सुरू आहे.उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना तुम्ही गिफ्ट दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे यांनी हास्यमुद्रेत मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.शिंदे म्हणाले की ,धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरले आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे, पण आम्ही कामाने उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here