Home जालना जालन्यामध्ये तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

जालन्यामध्ये तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

47
0

मराठवाडासाथी न्यूज
जालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथील शॉक लागून विहिरीत पडलेल्या भावाला वाचवताना 3 सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीस उघडकीस आली आहे. जालना जिह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (27 वर्ष), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (24 वर्ष), सुनील आप्पासाहेब जाधव (18 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोटार चालू करत असताना शॉक बसून एक जण विहिरीत पडला, त्याला वाचवण्यासाठी इतर दोनी भावांनी देखील विहिरीत उडी मारली. पण दोघांनाही पोहोता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. एकमेकांची मदत करत असताना तिघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रात्री उशिरपर्यंत तिघेही घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीय चिंतेत पडले होते. घरचे त्यांना कॉल ट्राय करत राहिले परंतु कॉल कोणीही उचलत नव्हते. म्हणून नातेवाईकांना सांगितले. कुटुंबीय 2 वाजता शेतात गेल्यावर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here