Home पैठण नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात,चार लाख भाविकांची गर्दी

नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात,चार लाख भाविकांची गर्दी

212
0


पैठण:नाथषष्ठी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यभरातून दिंड्या, पताका घेत सुमारे ४ लाख वारकऱ्यांची मांदियाळी नाथसागर धरणाजवळ जमली. पंढरपूरच्या वारीनंतर नाथषष्ठीची वारी ही सर्वात मोठी असते. येथे दिंडीतील वारकरी घरच्या देव्हाऱ्यातील देव आणतात. गोदाकाठावर त्यांना स्नान घालतात.
राज्यभरातून ५५० दिंड्या नाथषष्ठी उत्सवात सहभागी झाल्या आहेत.काल्याच्या दहीहंडीचा वाद कोर्टात : काल्याची दहीहंडी १५ मार्चला फोडली जाईल. नाथांच्या वाड्यात ती फाेडावी, अशी वंशजांची मागणी आहे. मात्र ती बाहेरील डोममध्ये फोडावी, असे संस्थानचे मत आहे. वादावर आज कोर्टात निर्णय होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here