Home क्रीडा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पूजा वस्त्राकर सेमी फायनलमधून बाहेर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पूजा वस्त्राकर सेमी फायनलमधून बाहेर

436
0

मुंबई, : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे.दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज गुरुवारी सेमीफायनाचा पहिला सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे.भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सेमी फायनल सामन्यातून बाहेर पडकली आहे. पूजा काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळत होती. परंतु आता बीसीसीआयने अखेर याची अधिकृत माहिती दिली आहे.बीसीसीआयच्या सांगण्यानुसार, पूजाला अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळू शकणार नाही. तिच्या ऐवजी स्नेह राना हिला संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here