Home राजकीय शिंदे गटाच्या व्हीपसाठी ठाकरे गटाचा प्लॅन तयार!

शिंदे गटाच्या व्हीपसाठी ठाकरे गटाचा प्लॅन तयार!

259
0

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या हातून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना गेल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन होणार आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाने व्हीप काढण्यास आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील इतर आमदारांची आमदारकी धोक्यात येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
व्हीप बाबत बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, आम्हाला अजूनही व्हीप प्राप्त झालेला नाही. आम्ही व्हीप बजावणार नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं आहे. मात्र तरीही त्यांनी व्हीप बजावला तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ असं प्रभू यांनी म्हटलं आहे. तसेच अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर आवाज उठवणार? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की अधिवेशन आताच सुरू झालं आहे. राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर बघू.

व्हीप म्हणजेच पक्षादेश

व्हीप म्हणजेच पक्षादेश. पक्षाने एखादे विधेयक किंवा मुद्द्यावर सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय पाळण्याचा आदेश दिला जातो त्यालाच व्हीप असं म्हणतात.

व्हीप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो. कार्यकारी विधिमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हाच व्हीपचा हेतू असतो.

एखाद्या पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक विचारसरणीनुसार निर्णय न घेता पक्षाच्या धोरणांनुसार मतदान करावे या हेतूने व्हीप काढला हातो.

व्हीपमुळे एकप्रकारे पक्षाच्या सदस्यांना एखादी भूमिका घेण्याचे आदेश दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here