Home राजकीय संदीपान भुमरे गावठी मंत्री -चंद्रकांत खैरेंची टीका ; मातोश्रीवर खैरेंना कुणी...

संदीपान भुमरे गावठी मंत्री -चंद्रकांत खैरेंची टीका ; मातोश्रीवर खैरेंना कुणी विचारत नव्हतं- संदीपान भुमरेंचा पलटवार

10098
0

शिंदे गट-विरुद्ध ठाकरे गट वाद पेटणार

औरंगाबाद : शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातील आणखी दोन आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट करत शिंदे गटातील १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून ते आम्हाला फोन करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना खैरे यांनी हा दावा केला आहे.
शिंदे गटातील काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं.. आम्हाला माफ करा. असं जवळपास १० ते १५ जण त्यांना माहितीये की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत.” असं चंद्रकांत खैरे माध्यमाला बोलताना म्हणाले आहेत. “संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, नशीबाने ते आमदार झाले आहेत. अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, संदीपान भुमरे यांनी काल पैठण येथे बोलताना ठाकरे गटातले २ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेतील सर्वांत जास्त नेते आमचे आहेत, मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कोणती आहे ? असा सवालही त्यांनी यावेळी केला होता. त्यानंतर माजी खासदार खैरे यांनी शिंदे गटाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

मातोश्रीवर खैरेंना कुणी विचारत नव्हतं- संदीपान भुमरेंचा पलटवार
चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांना डिवचलं. आता संदिपान भुमरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. होय मी आहेच गावठी मंत्री.. मी आहेच मुळात गावठी पण मी कुठेही काहीही बोलत नाही, असं म्हणत भुमरे यांनी खैरेंना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. भुमरे म्हणाले कि, चंद्रकांत खैरे हे स्वतःच शिवसेनेत नाराज आहेत. ठाकरे गटात राहिलेले अनेक आमदार शिंदे गटात येणार आहेत, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. संदिपान भुमरे यांनी मातोश्रीवरही आपल्या टीकेचा बाण सोडला आहे. खैरेंना मातोश्रीवर कुणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे या जिल्ह्याला लागलेली कीड आहे. या शहराची वाट लागण्याला कारणीभूत चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली, असंही भुमरे म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here