Home Uncategorized म्हणून रोहित पवारांनी केलं माजीमंत्री पंकजा मुंडेंचं कौतुक !

म्हणून रोहित पवारांनी केलं माजीमंत्री पंकजा मुंडेंचं कौतुक !

440
0

मराठवाडा साथी न्यूजः भाजपातील नेतृत्वावर नाराज असलेल्या नेत्यांपैकी एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वादळ शमत नाही तोच पंकजा मुंडे यांनी मंगळवारी शरद पवारांची स्तुती केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केले.

दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

शरद पवारांचे कौतुक
पंकजा मुंडे यांनी “शरद पवार यांना हॅट्स ऑफ. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे” असं म्हटलं आहे. दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला.

आमदार पवार यांचे ट्विट : “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.

मंगळवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरू होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत यशस्वी तोडगा निघाला आहे
दरम्यान, कामगारांना 14 टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन 19 टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केल्याने उसतोड कामगार आता कारखान्यांकडे रवाना होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here