Home औरंगाबाद कोरोनाबाधित नसताना मेलट्रॉनमध्ये बनविले बनावट उपचार-डिस्चार्ज कार्ड ; कोटक महिंद्रा इन्शुरन्स कंपनीकडून...

कोरोनाबाधित नसताना मेलट्रॉनमध्ये बनविले बनावट उपचार-डिस्चार्ज कार्ड ; कोटक महिंद्रा इन्शुरन्स कंपनीकडून उकळले पावणे पाच लाख

43529
0

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे
कोरोनाबाधित नसताना उपचार घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार करून नऊ जणांनी कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ४ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ जून २०२१ ते १ जानेवारी दरम्यान मनपाच्या चिकलठाणा येथील मेलट्रॉन रुग्णालयात घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात कोटकच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून सोमवारी (दि.२८ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असित जगदिश वाघ (३१, रा . जयभिमनगर , टाऊनहॉल), अमोल हनुमंतराव रानसिंग (३८, रा . प्लॉट नं . ३०२, सुंदरनगर, नागेश्वरवाडी), शिवानी शिरिष मुळे (२६, रा . एन . ११. सी. ३. २२/१ गजानन नगर, टिव्ही सेंटर हडको), शुभांगी भरतसिंग राजपुत (२३, रा . घर क्र .१-२०२ / ८०६ पोस्ट ऑफिस, नारळी बाग), किशन लक्ष्मणलाल गुर्जर (३३, रा . आदर्श नगर, रांजणगाव शेणपुंजी), गणेश काकासाहेब कडू (२३, रा. गिरीराज कॉलनी, पंढरपुर ), या सहा जणांनी बनावट डिस्चार्ज कार्ड सादर करून विम्याची रक्कम उचलली आहे. तर इंदल भाऊसिंग राजपुत (४०, रा. ५३/ गिरीराज हॉसिंग सोसायटी, पंढरपूर), इम्रान शेख मुश्ताक (३०,घर क्र. ५-२-५-१८ पी. सब्जी मंडी, खोकडपुरा), प्रविण प्रभाकर पवार (२८, रा. देऊळगाव राजा, शिमगाव जहांगिर बुलडाणा, ह.मु. सातारा परिसर) यांनी बनावट डिस्चार्ज कार्ड तयार करून कंपनीला सादर केले. मात्र, त्यानंतर या सर्वांचा भांडाभोड झाला.

जहीर खान अजगर खान (४१, रा. भायखळा वेस्ट, मुंबई) हे कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये जोखीम नियंत्रण मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहा जणांनी मनपाच्या मेलट्रॉन कोविड केअर सेंटर येथे कोविड आजाराचे उपचार घेतलेले नसताना उपचार घेतलेबाबतचे बनावट डिस्चार्ज कार्ड तयार करून ते कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पॉलिसी क्लेमसाठी दाखल केले. कागदपत्रानुसार कंपनीने सहा जणांना एकुण ४ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम अदा केली. तसेच अन्य तिघांनी बनावट डिस्चार्ज कार्ड तयार पॉलिसी रक्कम मिळावी म्हणून सादर केले. मात्र, कंपनीने कागदपत्रे पडताळून पहिली असता हे सर्व बोगस असल्याचे उघडकीस आले. मॅनेजर जहीर खान यांनी याबाबत फसवणूक झाल्याची तक्रार एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here