Home क्रीडा आयपीएलमध्ये बुमराह खेळणार नसल्यानी चाहत्यांची नाराजी

आयपीएलमध्ये बुमराह खेळणार नसल्यानी चाहत्यांची नाराजी

229
0

मुंबई : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच आजारपण दूर होत नाही . भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामान्यापासून बुमराह भारतीय संघात परतणार होता. परंतु ,अद्याप बुमराह मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीतील मालिकेत खेळणार नाही. अशातच आता बुमराह मार्च अखेरीस सुरु होणाऱ्या आयपीएल मधून देखील बाहेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कंबरेच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 भारतीय संघात परतलेला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीपर्यंत तो बरा होऊन संघात परतेल अशी आशा होती. परंतु त्याची दुखापत पूर्णपणे बरी नसल्याने तो कसोटी मालिकेला देखील खेळू शकणार नाही .

सूत्रांच्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहचे आयपीएल 2023 पर्यंत तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तसेच जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंतही तो भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याच्या सांगण्यात येत आहे. परंतु बुमराह हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडू असल्याने बीसीसीआय आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे.बुमराह हा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू आहे, तेव्हा बुमराहच्या आयपीएल खेळण्याबाबत अधिकृत माहिती कधी समोर येते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here