Home औरंगाबाद जी-२०:स्मृती इराणींच्या उपस्थितीत आज डब्ल्यू-२०चे उद्घाटन

जी-२०:स्मृती इराणींच्या उपस्थितीत आज डब्ल्यू-२०चे उद्घाटन

574
0

जगभरातील 150 महिलांचा सहभाग

जी २० परिषदेसाठी स्मृती इराणी यांचे छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले आहे.जी-२० अंतर्गत असलेल्या डब्ल्यू-२० परिषदेसाठी जगभरातून दीडशे महिला शहरात दाखल झाल्या आहेत. या परिषदेचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाल्या आहेत.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्य अर्थमंत्री भागवत कराडही उपस्थित होते.जी-२० परिषदेच्या सहकार्याने व केंद्र सरकारच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला-२० परिषद भरवण्यात येणार आहे. जी २० च्या उद्घाटनानंतर ‘सूक्ष्म, लघु आणि स्टार्टअप्स उद्योगात महिलांचे सक्षमीकरनावर सकाळी ११:३०ते सायंकाळी ७:३० पर्यंत चर्चासत्र होईल.पहिल्या दिवशी समारोप सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री रविना टंडन यांची उपस्थिती असेल . त्यानंतर पाहुण्यांसाठी ताज हॉटेल येथे वेलकम डिनर आयोजित करण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here