Home आरोग्य दाताचा पिवळेपणा घालण्यासाठी सोपे उपाय

दाताचा पिवळेपणा घालण्यासाठी सोपे उपाय

289
0

स्वच्छ आणि पांढरे दात सर्वांनाच आवडतात. पण काही लोकांचे दात बरेच पिवळे दिसतात. दातांमध्ये पिवळेपणा दिसला तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेक लोक दातांची योग्य काळजी घेत नाहीत त्यामुळे त्यांचे दात अनहेल्दी आणि पिवळे दिसतात. दातांची नीट निगा राखणे, वेळोवेळी दात स्वच्छ करणे, खाल्ल्यावर चूळ भरणे अशा उपायांनी दात चांगले राहू शकतात. तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे इतके अवघड नाही. काही सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही दातांचा पिवळेपणा कमी करू शकता.

दात पिवळे होण्याचे कारणदातांचा पिवळेपणा काही मिनिटात होईल दूर ‘या’ टिप्स फाॅलो करा!
– दात नीट स्वच्छ न घासणे

– अनुवांशिक कारण

– दातांवर प्लेक जमा होणे

– कॅफेनयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे

– अँटीबायोटिक्सचे जास्त सेवन करणे

– फ्लोराइडचे जास्त सेवन

– वय वाढणे

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय

1) आलं:आल्याचा वापर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी गुणधर्म देखील आढळतात. आले बारीक करून पेस्ट बनवा. ते तुमच्या टूथपेस्टमध्ये मिसळा. या मिश्रणाने दात घासल्याने पिवळेपणा दूर होऊ शकतो.

2) कडुलिंब व तुळस:कडुलिंब आणि तुळस यांचे मिश्रण दातांसाठी फायदेशीर आहे. या मिश्रणाच्या वापराने दात स्वच्छ होतात तसेच तोंडाच्या आरोग्याची समस्या दूर होते. टूथपेस्टमध्ये कडुलिंब आणि तुळशीचा रस मिसळा. तुम्ही हे रोज वापरू शकता. तुळस आणि कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. तसेच कडुनिंब आणि तुळशीची पावडर दातांच्या आरोग्यासाठी वापरली जाऊ शकते.

3) लिंबू आणि मीठ:मिठाच्या मदतीने दातांवर जमा झालेला प्लेक साफ केला जातो. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते. लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण वापरून पिवळे दात स्वच्छ केले जातात. तुमच्या टूथपेस्टमध्ये लिंबाचा रस आणि मीठ घाला. या मिश्रणाने दात स्वच्छ करा, नंतर स्वच्छ धुवा. हे दिवसातून 2 वेळा वापरले जाऊ शकते.

4) ॲपल सायडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस:पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर चा वापर करा. ॲपल सायडर व्हिनेगर हे ॲसिडीक असते. हे क्लिअरिंग एजंट म्हणून काम करते. 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण टूथपेस्टमध्ये मिसळून दात स्वच्छ करा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता.

5) संत्र्याच्या सालांची पावडर:दातांचा पिवळेपणा घालवून पांढरे स्वच्छ दात हवे असतील तर संत्र्याची साल वापरा. संत्र्याची साल वाळवून ती बारीक करून पावडर बनवा. या पावडरमध्ये चिमूटभर लवंग पावडर मिसळा आणि आपल्या टूथपेस्टमध्ये मिसळा. या मिश्रणाने दात स्वच्छ केल्यास पिवळसरपणा हळूहळू कमी होऊ लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here