Home महाराष्ट्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांच्या घरी ‘ईडीचे’ पथक…!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांच्या घरी ‘ईडीचे’ पथक…!

468
0

मराठवाडा साथी न्यूज

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे म्हणजेच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत.त्यांचा मुलगा पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यांच्या घरासोबत कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही मुले परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईडीचे तीन पथकं तपासासाठी प्रताप सरनाईक यांच्या घरी पोहोचले. त्यांनी सरनाईक, त्यांचे दोन मुले आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीने बोलावले आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे समजते.

प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ‘किरीट सोमय्यांनी’ शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे.पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही.दरम्यान,शिवसेना नेते थोड्याच वेळात ‘पत्रकार परिषद’ घेणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here