Home मनोरंजन कंगनाच्या चाहत्याने केली तिच्या फोटोची पुजा… व्हिडिओ व्हायरल

कंगनाच्या चाहत्याने केली तिच्या फोटोची पुजा… व्हिडिओ व्हायरल

397
0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बॉलिवूडमधील काही लोकांवर नेहमीच टिका करत असते.
ती त्यांना बॉलिवूड मफिया म्हणत असते. नुकतच प्रियंकाने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये राजकारण चालतं असं सांगतिलं त्यावेळी कंगनानं लगेच प्रतिक्रिया दिली.
कंगनालाही नेहमीच या बॉलिवुड गँगकडून टार्गेट केलं जातं असंही ती म्हणतं असते. त्याचबरोबर कंगना वक्तव्यामुळेही चर्चेत असते.
कंगना तिच्या स्पष्टवक्ते विधानांमुळे चर्चेत असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. कंगनाच्या अशाच एका चाहत्याच्या क्रेझमुळे चर्चेत ती आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिची चाहती कंगनाची आरती करत आहे.
खरं तर हा व्हिडिओ जूना आहे . हा व्हिडिओ कंगनाच्या वाढदिवसाच्या वेळीचा आहे. मात्र सध्या तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कंगना राणौतच्या वेड्या चाहतीने अभिनेत्रीला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने कंगनाच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भिंतीवर कंगना राणौतच्या फोटोची आरती करताना दिसत आहे.


व्हिडिओमध्ये ती ‘हॅपी बर्थडे टू यू’ असे म्हणताना दिसत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा क्विन, देव तुला आशीर्वाद देईल.” असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.आता या व्हिडिओवर खुद्द कंगना राणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने फॅनचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ केवळ नऊ सेकंदांचा आहे मात्र त्यावर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. अशाप्रकारे कंगनाची आरती केल्याचे पाहिल्यानंतर अनेकजण कंगनाची आणि तिच्या चाहत्यांची खिल्ली उडवत आहेत. तर अनेकजण कंगना ही त्यांची लाडकी अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here