Home राजकीय शिंदे- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह ट्विट:मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल.

शिंदे- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह ट्विट:मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल.

604
0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या एका कार्यकर्त्याला शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह टीका करणारे एक ट्विटर अकाउंट निदर्शनास आले, त्यांनी या प्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी मुंबईतील सार्थक कपाडी या अकाउंट धारकारविरुद्धव तक्रार नोंदवली असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ३५४, ५००, ५०४, ५०५, ५०७ आणि आयटी ॲक्टच्या कलम ६७ अन्वये या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, या संपूर्ण प्रकारामागे ठाकरे गट असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी वृत्तवाहिनिशी संवाद साधताना केला. खालच्या स्तरावर, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्याच आला आहे. हा व्यक्ती कोण आहे याची चौकशी केली असता तर सार्थक कपाडी हा मुंबईचा असल्याचे कळले. त्याची उद्धव ठाकरेंसोबत उठबस असते आणि तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे, असा आरोप खोपडे यांनी केला आहे. तर पोलिसांनी याची चौकशी करावी, असेही आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले आहे. सार्थक कपाडी ट्विटर हॅण्डल स्वत: वापरतो की त्याच्या नावाने फेक ट्विटर हॅण्डल तयार करण्यात आले आहे की हे अकाऊंटच फेक आहे, याचा सायबर पोलिसांकडून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here