Home आरोग्य सकाळी कॉफी प्यायची सवय ठरू शकते घातक

सकाळी कॉफी प्यायची सवय ठरू शकते घातक

604
0

अनेक असे लोक आहेत ज्यांची सुरुवात सकाळ चहाने होते. चहा पिल्याने झोप जाते आणि थकवा दूर होतो असाही अनेकांचा समज आहे. तसेच कॉफीचा एक घूट पिऊन देखील अनेकांना थकवा गेल्याचा फिल येतो. मात्र सकाळी सकाळी कॉफी पिणे तुमच्या शरीरासाठी किती घातक ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे का? अशी अनेक कारणे आहे ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. विशेषत: महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये. त्यामागचं कारण म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने शरीरातील कार्टिसोल हार्मोनची लेव्हल वाढते. ज्याने तुमच्या ओव्यूलेशन, वजन आणि हॉर्नोन्सवर वाईट परिणाम होतो.सकाळी सकाळी स्ट्रेस हॉर्मोनची लेव्हल फार जास्त असते. अशा वेळी जेव्हा तुम्ही सकाळी कॉफीचं सेवन करता तेव्हा कार्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी होण्याऐवजी आणखी वाढते. हा हार्मोन शरीरासाठी चांगला मानला जातो. मात्र सकाळी स्ट्रेस लेव्हल जास्त असल्याने तुमच्या शरिरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तुमचं ब्लड शुगर लेव्हलही वाढायला लागते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here