Home राजकीय भारतीय संसदेत चीन घुसखोरीचा मुद्दा मांडण्याची परवानगी नाही:ब्रिटनमध्ये राहुल गांधीचे भाषण

भारतीय संसदेत चीन घुसखोरीचा मुद्दा मांडण्याची परवानगी नाही:ब्रिटनमध्ये राहुल गांधीचे भाषण

614
0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी ब्रिटन आणि चीनचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, भारतीय संसदेत चिनी सैन्याच्या भारतात घुसखोरीचा मुद्दा विरोधकांना मांडण्याची परवानगी नाही.राहुल गांधी रविवारी लंडनमधील हाऊंस्लो येथे १५०० परदेशी भारतीयांच्या उपस्थितीत संबोधन करत होते. रविवारी इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या इंडिया इनसाइट्स कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की- भारताला चीनपासून सावध राहण्याची गरज आहे. चीन सीमेवर खूप सक्रीय आणि आक्रमक होतांना दिवसेंदिवस दिसून येत आहे.दुसरीकडे, आज राहुल गांधी ब्रिटिश संसदेत भाषण करणार आहेत. ते आयओसीच्या यूके चॅप्टर अंतर्गत ओव्हरसीज प्रोग्राम आणि प्रीमियर थिंक टँक कार्यक्रमाला संबोधित करतील. 7 मार्चला ते भारतात परतणार आहेत.संसदेत आवाज उठवू न देणे ही अनिवासी भारतीयांसाठी लाजिरवाणी बाब आहे. राहुल गांधी म्हणाले की- भारतातील सरकार विरोधकांना मत मांडायला परवानगी देत नाही. तिथल्या संसदेतही असेच घडते. वस्तुस्थिती अशी आहे की, चीनमधून भारतात मोठी घुसखोरी सुरू आहे. यावर जेव्हा आम्ही संसदेत बसून प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. हे खरोखर लाजिरवाणे आहे.ते पुढे बोलताना म्हणाले की, भारत हा मुक्त विचारांचा देश होता, आता तो नाही. आपला देश अधिक मुक्त विचारांचा आहे. असा देश जिथे आपण आपल्या ज्ञानाकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आता हे सर्व उद्ध्वस्त होऊ लागले आहे. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. नेता केंब्रिजमध्ये बोलू शकतो पण भारतीय विद्यापीठात नाही. राहुल म्हणाले की, मला हे खूप विचित्र वाटते. एक भारतीय नेता केंब्रिजमध्ये बोलू शकतो. तो हार्वर्डमध्ये बोलू शकतो, पण भारतीय विद्यापीठात तो बोलू शकत नाही. विरोधी पक्षांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर सरकार ते होऊ देत नाही. हा तो भारत नाही, जो आपण पूर्वी ओळखला जात होता.५ मार्च रोजी, केंब्रिजपासून १०० किमी अंतरावर लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या इंडिया इनसाइट्स कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भारताला चीनशी सावध राहण्याची गरज आहे. तो सीमेवर खूप सक्रिय आणि आक्रमक आहे.७ दिवसांच्या यूके दौऱ्यावर गेलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्या व्यासपीठावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने इंडिया इनसाइट्स अंतर्गत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान राहुल म्हणाले- देशाचा अपमान मी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी करत आहे.राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्लाबोल केला जातो. बीबीसीच्या बाबतीतही तेच झालं. राहुल यांनी आयकर छापे, लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आणि भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले.महात्मा गांधी आणि गुरु बसवण्णा यांना अभिवादनभाषण देण्यापूर्वी राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे लंडनमधील जुने निवासस्थान असलेल्या आंबेडकर हाउसमध्ये दाखल झाले. त्यांना अभिवादन केले. महात्मा गांधी आणि गुरु बसवण्णा यांच्या पुतळ्यांना देखील अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here