Home अहमदनगर न्यु इंग्लिश स्कुल चांदेकसारे माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

न्यु इंग्लिश स्कुल चांदेकसारे माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

4697
0
कोपरगाव : न्यु इंग्लिश स्कुल चांदेकसारे माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ३६ वर्षानंतर स्नेह मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी डॉ. गोरक्ष रोकडे, शांतीलाल होन, पोलीस पाटील मीराताई खरात, प्रेरणा भोसले, विनायक पवार, विठोबा बढे, कर्णा चव्हाण, श्रीधर साळुंके आदी (छाया किसन पवार)

कोपरगाव : किसन पवार
कोपरगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे या शाळेतील १९८६ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा ३६ वर्षानंतर स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला कोव्हीड काळात गेलेल्या मित्राच्या पाठीशी राहणे त्यांना पाठबळ देणे हेच खरे या स्नेह मेळाव्याचे सकारात्मक असे फलीत ठरेल असे प्रतिपादन डॉ गोरक्ष रोकडे यांनी आपल्या भाषणात केेल यावेळी निवृत्त अधिकारी शांतीलाल होन, पोलीस पाटील मीराताई खरात प्रा. प्रेरणा भोसले नामदेव बढेे,विनायक पवार, विठोबा बढे, सुभाष चव्हाण, बाळू आहेर, आदी उपस्थित होते डॉ गोरक्ष रोकडे पुढे म्हणाले की बालपणाचे सवंगडी बालपणाच्या आठवणी शालेय जीवनातील खोडकरपणा ह्या विविध प्रकारच्या आठवणी घेऊन पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही सर्व त्यावेळची विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्यानंतर विविध आठवणींनी व बालपणाच्या अनेक स्मृती जागृत झाल्याचे सांगत त्यांनी विविध आठवणी यावेळी सांगितल्या हा स्नेह मेळावा उत्साह पूर्व वातावरणात संपन्न झाला त्यावेळची ही बाल सवंगडी आता विविध क्षेत्रात काम करून आपली वेगळी ओळख तयार करून तयार करून आल्यानंतर सुखदुःखाच्या आठवणी बरोबरच कोरोनाच्या काळात अकाली मृत्यू झालेल्या मित्रांच्या आठवणीनेही काही वेळ स्तब्ध झाले. आपल्या बालपणीच्या दिवंगत सवंगड्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या वेळी रोकडे यांनी आपल्या बालपण ते वयाच्या पन्नाशीचा प्रवास यातील विविध आठवणी सांगून या स्नेह मेळाव्याचा उद्देश ग्रामीण भागातील तरुण शिक्षणाच्या माध्यमातून क्षेत्राकडे गेला तरी बालपण तारुण्य हा प्रवास कोणताही विद्यार्थी विसरू शकत नाही असे सांगताना इतक्या प्रदीर्घ वर्षानंतर भेटलेले हे सवंगडी हा भेटलेला आनंद असला तरी शालेय जीवनातील जीवनातील काही काही मित्र कोविड सारखे आजारात गेल्यामुळे सर्वांना दुःख असले तरी या मित्रांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहून त्यांना पाठबळ देणे हेच या स्नेहमेळाव्याचे खरे फलित ठरेल असा विश्वास व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून हा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्रीधर साळुंके, कर्णा चव्हाण शुभांगी रासकर नानासाहेब होन निवृत्त शिक्षक चांगदेव वक्ते आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here