Home अहमदनगर चांदेकसारे येथील महादेव, शनी व खंडोबा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

चांदेकसारे येथील महादेव, शनी व खंडोबा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

25861
0

कोपरगाव : किसन पवार
चांदेकसारे येथील पुरातन असलेले महादेव व शनी मंदिर रस्त्याच्या कामात रुंदीकरणात गेल्यामुळे नवीन मंदिर उभे करण्यासाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने वीस गुंठे जागा देऊन ग्रामस्थांच्या व दानशुरांच्या सहकार्यातून पन्नास लाख रुपये खर्च करून त्या जवळच महादेव, शनि व खंडोबा ही मंदिरे उभे करण्याचे काम ५० लाख रुपये खर्च करून सुरू असून या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून या मंदिराचे संपूर्ण काम होत नाही तोपर्यंत त्यासाठी योगदानाबरोबरच येथील तीन ग्रामस्थांनी दाढी कटिंग न करण्याचा संकल्प केला होता त्याला जवळपास एक वर्ष झाल्याने या संकल्पाची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. ग्रामीण भागात आजही धार्मिक श्रद्धा मोठी आहे गावातील पुरातन मंदिर जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी भाऊसाहेब होन, अशोक होन व किशोर होन या तीन मित्रांनी दाढी कटिंग न करण्याचा संकल्प करून त्याबरोबरच मंदिरासाठी योगदान देण्याचे काम ते करत आहेत अशा प्रकारे मंदिराच्या कामासाठी त्याचा संकल्प करणारे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील या तिघा मित्रांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे चांदेकसारे गावात यांचा हा संकल्प चर्चेचा विषय ठरला आहे.

चांदेकसारे गावात उभारण्यात येत असलेल्या महादेव, शनी व खंडोबा मंदिर अंतिम टप्प्यात असून मंदिरासाठी योगदान देत तिघांनी मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत दाढी कटिंग न करण्याचा संकल्प केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here