Home औरंगाबाद लोहगावात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; दोन किलो गांजाही जप्त

लोहगावात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; दोन किलो गांजाही जप्त

29542
0

बिडकीन : लोहगाव येथे मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गांजा तस्कराच्या घरावर छापा मारून दोन किलो गांजा जप्त केला. सुदाम किसन जाधव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बिडकीन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक महेश घुगे यांच्या पथकाने हि कारवाई केली. तर त्या अगोदर मावसगव्हाण या गावातील लक्ष्मी माता मंदीराच्या समोरील मैदानावर जुगार खेळणाऱ्याना बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक संतोष माने यांच्या पथकाने छापा मारून पकडले. या कारवाईत पोलिसांनी २२ हजार ९० रुपये रोखसह जुगार खेळणारे कलिंदर रशिद शेख, दिलीप सुखदेव जाधव, विलास बाळासाहेब जाधव, दादासाहेब कुंडलीक जाधव यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक महेश घुगे, सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे आणि जमादार हनुमान धनवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here