Home क्रीडा नॅथन लायनने शेअर केला भेट दिलेल्या जर्सीचा फोटो

नॅथन लायनने शेअर केला भेट दिलेल्या जर्सीचा फोटो

3254
0

सिडनी : ऑस्ट्रेलियायाला हरवत भारताने ऐतिहासिक विजय मिळविला. हा सामना संपल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी एका जर्सीवर स्वाक्षरी करुन
नॅथन लायनला १०० कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केल्याबद्दल जर्सी भेट दिली होती.नॅथन लायनने आता या जर्सीचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जर्सीवर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मासह एकूण16 खेळाडूंची स्वाक्षरी आहे. फोटो शेअर करताना लायनने भारतीय संघासोबतच अजिंक्य रहाणेचं विशेष कौतुक केलंय. मालिका विजयाबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं त्याने अभिनंदन केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं नॅथन लायनने विशेष कौतुक केलं असून रहाणेला टॅग करुन त्याचे आभारही मानलेत. तसेच टीम इंडियाने सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिल्याबद्दलही लायनने आभार मानले आहेत.

“मालिका जिंकल्याबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं अभिनंदन. तू खिलाडूवृत्ती दाखवत टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिलीस त्यासाठी आभारी आहे” अशा आशयाची पोस्ट नॅथन लायनने केली आहे.

https://www.instagram.com/p/CKh6OyeDmhX/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here