Home क्रीडा राम चरण करणार विराटचा बायोपिक म्हणाला ..

राम चरण करणार विराटचा बायोपिक म्हणाला ..

247
0

RRR चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्कर २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या विजयानंतर राम चरणकडे ग्लोबल आयकॉन म्हणून पाहिले जात आहे. नुकतेच त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, मला खेळावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट करायचा आहे. त्याला विराट कोहलीचा बायोपिक करण्याची संधी मिळाली तर तो नक्कीच करेल.

मी विराट करेल, मीसुद्धा त्याच्यासारखा दिसतो – राम चरण
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राम चरणला विचारण्यात आले की, आगामी काळात कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडेल. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, मला खेळाशी संबंधित चित्रपट करायला आवडेल. त्याच्या उत्तरावर पत्रकाराने विचारले की, विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल का?यावर राम चरणने लगेच उत्तर दिले आणि म्हणाला- नक्कीच, विराट कोहली एक प्रेरणा आहे. मला संधी मिळाली तर मी त्याचा बायोपिक नक्की करेन. मी अगदी त्याच्यासारखा दिसतो.त्याच्या या वक्तव्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो नाटू-नाटू गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील आहे.
या कॉन्क्लेव्हदरम्यान राम चरणने ऑस्कर सोहळ्यात नृत्य न करण्याबाबत मौन सोडले. तो म्हणाला की त्याला समारंभात परफॉर्म करायचे होते, परंतु ऑस्कर समितीने त्याच्याशी संपर्क साधला नाही. तरीही समारंभात आपले गाणे सादर झाल्याचा आनंद आहे.
यावेळी राम चरणने नाटू-नाटू गाण्याच्या सरावाबद्दलही सांगितले. हे गाणे शूट करण्यासाठी १२ दिवस लागले असल्याचे सांगितले. सलग ७ दिवस त्यांनी या गाण्याचा सराव केला. त्यामुळे त्याचे गुडघे दुखू लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here