Home अंबाजोगाई सामाजिक बांधिलकी : रक्तदान करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले नववर्षाचे स्वागत

सामाजिक बांधिलकी : रक्तदान करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले नववर्षाचे स्वागत

545
0

अंबाजोगाई
एकिकडे जग नववर्ष सेलिब्रेशनच्या तयारीत असताना दुसरीकडे माञ सामाजिक भान ठेवून बांधिलकी जोपासत गुरूवार,दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी मावळत्या वर्षाला निरोप देत 51 काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान करून नववर्षाचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले.काँग्रेस पक्षाने संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत आज तारखेपर्यंत सुमारे 731 जणांनी वेळोवेळी झालेल्या शिबीरात रक्तदान केले आहे.राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी आहे. जनतेने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे असे आवाहन विविध स्तरांमधून करण्यात येत आहे.गुरूवार,दि.31 डिसेंबर रोजी आयोजित जीवनदान महाअभियान उपक्रमातर्गंत 51 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.जीवनदान महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा सलग दुस-या दिवशी आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,फ्रंटल ऑर्गनायझेशन,विविध सेलचे प्रमुख,जिल्हाध्यक्ष,तालुका,शहर,ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात आले होते.या संकटकाळात रक्तदान शिबीर आयोजीत करावे व जास्तीत जास्त रक्त संकलीत करून रक्तपेढीला पाठविण्याची व्यवस्था करावी असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होते. त्याला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाईत रक्तपेढीचे गरजेनुसार टप्याटप्याने या अभियानांतर्गंत नव्याने 51 जणांनी रक्तदान केले.याबाबत राज्य सरकारचे वतीने नुकतेच कोरोना काळात राज्यातील रूग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून व बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली तसेच जावेद छोटू गवळी यांचे पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली गवळीपुरा येथील कार्यकर्ते यांनी 28 ऑक्टोबर 2020 रोजी जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी निमित्ताने 37 जणांनी तसेच गुरूवार,दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी 14 जणांनी असे एकूण 51 जणांनी रक्तदान केले.गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक धम्मपाल सरवदे,जावेद गवळी, महेबूब गवळी,अब्दुल गवळी,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,राणा चव्हाण,दिनेश घोडके, सहशिक्षक विजय रापतवार,अमजदभाई,माऊली वैद्य आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ.अनुराधा मुंडे, डॉ.विनय नाळपे,राम रूपनवर,रमेश इंगळे, शेख बाबा यांच्यासह स्वा.रा.तीच्या रक्तपेढी विभागातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.यापूर्वी ही बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन काळात सुमारे 731 हून अधिक जणांनी रक्तदान करून राज्य सरकारच्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद दिला आहे. तसेच काँग्रेस पक्षाने दि.6 डिसेंबर 2020 (महापरिनिर्वाण दिन) पासुन जीवनदान महाअभियान राबविले या महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार,दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या पुढे आयोजित रक्तदान शिबीरात काँग्रेस पक्षासहीत महाविकास आघाडीतील सर्व समविचारी घटक पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी आहे. जनतेने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे असे आवाहन विविध स्तरांमधून करण्यात येत आहे.गुरूवार,दि.31 डिसेंबर रोजी आयोजित जीवनदान महाअभियान उपक्रमातर्गंत 51 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.जीवनदान महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा सलग दुस-या दिवशी आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,फ्रंटल ऑर्गनायझेशन,विविध सेलचे प्रमुख,जिल्हाध्यक्ष,तालुका,शहर,ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात आले होते.या संकटकाळात रक्तदान शिबीर आयोजीत करावे व जास्तीत जास्त रक्त संकलीत करून रक्तपेढीला पाठविण्याची व्यवस्था करावी असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होते. त्याला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाईत रक्तपेढीचे गरजेनुसार टप्याटप्याने या अभियानांतर्गंत नव्याने 51 जणांनी रक्तदान केले.याबाबत राज्य सरकारचे वतीने नुकतेच कोरोना काळात राज्यातील रूग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून व बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली तसेच जावेद छोटू गवळी यांचे पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली गवळीपुरा येथील कार्यकर्ते यांनी 28 ऑक्टोबर 2020 रोजी जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी निमित्ताने 37 जणांनी तसेच गुरूवार,दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी 14 जणांनी असे एकूण 51 जणांनी रक्तदान केले.गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक धम्मपाल सरवदे,जावेद गवळी, महेबूब गवळी,अब्दुल गवळी,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,राणा चव्हाण,दिनेश घोडके, सहशिक्षक विजय रापतवार,अमजदभाई,माऊली वैद्य आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ.अनुराधा मुंडे, डॉ.विनय नाळपे,राम रूपनवर,रमेश इंगळे, शेख बाबा यांच्यासह स्वा.रा.तीच्या रक्तपेढी विभागातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.यापूर्वी ही बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन काळात सुमारे 731 हून अधिक जणांनी रक्तदान करून राज्य सरकारच्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद दिला आहे. तसेच काँग्रेस पक्षाने दि.6 डिसेंबर 2020 (महापरिनिर्वाण दिन) पासुन जीवनदान महाअभियान राबविले या महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार,दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या पुढे आयोजित रक्तदान शिबीरात काँग्रेस पक्षासहीत महाविकास आघाडीतील सर्व समविचारी घटक पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here