Home अतिक्रमण दहा वाहनधारकांवर मनपाची कारवाई

दहा वाहनधारकांवर मनपाची कारवाई

127
0

छत्रपती संभाजीनगर:मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने मंगळवारी आझाद चौक ते राम मंदिर व पुढे रोशन गेटपर्यंत विविध अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई केली. आझाद चौक ते राम मंदिर यादरम्यान दहा चारचाकी वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. रस्त्यामध्ये वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्याचबरोबर रस्त्यावर ओटे बांधून तयार केलेले सात शेडही हटविले. राम मंदिरालगत सहा हातगाड्या व दोन लोखंडी टपऱ्या काढल्या. राम मंदिर ते रोशन गेट रस्त्यावरील दोन भंगार वाहने जप्त केली. रस्त्यावर उभारलेले पत्र्याचे शेड, दोन लोखंडी टपऱ्या, दोन रसवंतीगृहे आणि वाळू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here