Home देश-विदेश जो बायडन देणार भारतीयांना भेट!

जो बायडन देणार भारतीयांना भेट!

386
0

वॉशिंग्टन: पुढील वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर जो बायडन भारतीयांना भेट देणार आहेत. दस्तावेज नाहीत अशा पाच लाख भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना, आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचे प्रशासन यासाठी आराखडा तयार करणार आहे. या निर्णयाचा फायदा भारतीयांसह एक कोटी १० लाख लोकांना होणार आहे. याव्यतिरिक्त वर्षाकाठी सुमारे ९५ हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याबाबतही प्रणाली तयार करण्यात येणार आहे.

बायडन यांच्या निवडणूक अभियानाद्वारे जारी करण्यात आलेल्या धोरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘ते (बायडन) लवकरच अमेरिकी काँग्रेसमध्ये अनिवासी सुधारणा कायदा मंजूर करण्यावर काम करणार आहे. या अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या पाच लाखांहून अधिक भारतीयांसह एक कोटी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार बायडन हे दर वर्षी सुमारे सव्वालाख शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याचे लक्ष्य ठेवणार असून, कमीत कमी ९५ हजार शरणार्थींना देशात प्रवेश देण्यासाठी काँग्रेससोबत काम करणार आहेत. उल्लेखनीय आहे, की यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकी फर्स्ट’ची घोषणा देऊन स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याबाबतचे नियम कडक केले होते. बायडन यांच्या या अहवालात, बायडन प्रशासन भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनविण्यास मदत करील; तसेच दहशतवाविरुद्धच्या लढाईत भारताला मदत करणार असून, भारत-अमेरिकेचे संबंध दृढ करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here