Home अतिक्रमण छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

885
0

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत मुरकुटडोह आऊटपोस्टअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेवरील दक्षिणपूर्व भागातील आऊट पोस्टपासून 3 कि.मी.अंतरा वरील टकेझरी जंगल पहाडी परिसरात शुक्रवारला सायकांळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास पोलिसांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाल्याची घटना घडली.

या घटनेत सहा ते सात नक्षली हे छत्तीसगड वरुन महाराष्ट्रातील सीमेवरील जंगलात शिरत असल्याचे शोध मोहिमेवर असलेल्या गोंदिया पोलिसांच्या पथकाला दिसताच त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नक्षल्यांनीही गोळीबार करत घटनास्थळावरुन परत छत्तीसगडच्या दिशेने फरार झाले. या घटनेत कुणीही जखमी झाला नसून सालेकसा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सहा ते सात संशयित व्यक्तीच्या हालचाली या परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्या परिसरात शोधमोहीम वाढवली होती. दरम्यान, महाराष्ट्राच्या सीमेत शिरत असताना शोधमोहीम करणाऱ्या पथकांनी त्यांचेवर गोळीबार केला असता त्यांच्याकडून परत गोळीबार करण्यात आला. दोन्हीकडून अर्धातास गोळीबार झाला. पण अंधाराचा फायदा घेत नक्षली पसार झाल्याचे गोंदिया जिल्हा नक्षल सेल प्रमुख दिनेश तायडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here