Home क्राइम पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने IPS अधिकाऱ्यांना गंडा मदतीची पोस्ट व्हायरल

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने IPS अधिकाऱ्यांना गंडा मदतीची पोस्ट व्हायरल

397
0

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडण्यात आले. त्यानंतर या बनावट खात्यावरून देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच मोक्षदा पाटील यांनी याबाबत सायबर खात्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर अनेकांकडून रिपोर्ट गेल्यानंतर २७ मार्चला रात्री ११ वाजता हे खाते बंद करण्यात आले. मात्र अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी मोक्षदा पाटील यांचे खाते असल्याच्या विश्वासाने पैसे पाठवले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वासाने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे.

कोण आहेत मोक्षदा पाटील?
मोक्षदा पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलिस अधीक्षक पदी कार्यरत आहे. याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी कार्य केले आहे. त्यांच्या कामाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. त्यांना लेडी सिंघम म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे पती आस्तिककुमार पांडेय छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here