Home क्रीडा मुंबई इंडियन्सचा पहिला सामना आरसीबीसोबत, पाहा वेळापत्रक

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना आरसीबीसोबत, पाहा वेळापत्रक

633
0

आयपीएलच्या रनसंग्रामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या संघामध्ये सलामीचा सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचा सफर दोन एप्रिलपासून सुरु होणार आहे. बेंगलोरमध्ये मुंबई आणि आरसीबी यांच्यात लढत होणार आहे. आयपीएल जसजसी जवळ येत आहे, तसतसे वेळापत्रकाच्या चर्चा रंगत आहेत. आज आपण मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.. मुंबईचा सामना कुणाबरोबर कधी… कुठे होणार आहे.. याबाबत माहिती समजून घेणार आहोत…

पाहा मुंबई इंडियन्स कुणासोबत अन् कुठे खेळणार ?

२ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण बेंगलोर.
८ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण मुंबई.
११ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण दिल्ली.
१६ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
१८ एप्रिल : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण हैदराबाद.
२२ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण मुंबई.
२५ एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण अहमदाबाद.
३० एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण मुंबई.
३ मे : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण मोहाली.
६ मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
९ मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.
१२ मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स – ठिकाण मुंबई.
१६ मे : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण लखनौ.
२१ मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).

मुंबई इंडियन्सचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.

यंदाच्या लिलावात मुंबईनं विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी –
कॅमरुन ग्रीन (१७.५कोटी), नेहाल वढेरा (२० लाख), शम्स मुलानी (२० लाख), विष्णु विनोद (२० लाख), डुआन जेंसन (२०लाख), पीयूष चावला (५० लाख), झाई रिचर्डसन (१.५ कोटी), राघव गोयल (२० लाख).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here