Home मनोरंजन अनुष्काचे बेबीबंपसह ‘फोटोशूट’…!

अनुष्काचे बेबीबंपसह ‘फोटोशूट’…!

242
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे.त्यामुळे सध्या अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून अनेकदा बेबीबंपसोबतचे फोटो शेअर करत असते.यावेळी तिने बाळासाठी खास फोटोशूट केले आहे.फॅशन आणि लाइफस्टाइल मासिक VOGUE INDIA साठी अनुष्काने फोटोशूट केले आहे.‘Capturing this for myself , for life !’, असे कॅप्शन देत अनुष्काने काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंवरून शेअर केले आहेत.महत्वाचे म्हणजे यात अनुष्काचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

दरम्यान,हे मासिक जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित होणार आहे. याचे काही फोटो अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CJaywc2ps9U/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here