Home अर्थकारण शेअर बाजार वाढला पण अदानी ग्रुपच्या शेअर्सचे काय हाल झालेत

शेअर बाजार वाढला पण अदानी ग्रुपच्या शेअर्सचे काय हाल झालेत

639
0

मुंबई : दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी वर्ष २०२३ ची सुरुवात अत्यंत वाईट ठरली. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाला आणि अदानींच्या साम्राज्याची अवस्था आणखी बिकट झाली. अवघ्या महिन्याभरात गौतम अदानी जगातील अब्जाधीशांच्या तिसऱ्या क्रमांकावरून थेट टॉप ३० यादीतून बाहेर फेकले गेले तर समूहाचे बाजार भांडवलही १०० अब्ज डॉलरच्या खाली गडगडले. आता १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून सोमवारचा पहिला कामकाजाचा दिवस देखील त्यांच्यासाठी तोट्याचा ठरला.

बाजारात अदानी समूहाचे १० कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्यापैकी सोमवारच्या सत्रात ८ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह क्लोज झाले. तर ACC आणि अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजीने व्यवहार पाहायला मिळाला.आर्थिक वर्षाचा पहिला व्यवसाय दिवस गौतम अदानी यांच्यासाठी चांगला राहिला नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया संबंधित समूहाच्या व्यवहारांवरील नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ही बातमी येताच सोमवारी ग्रुप कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. तपास अदानी समूहाच्या व्यवहाराशी संबंधित आहे, ज्यात संस्थापक गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित किमान तीन परदेशी संस्थांचा समावेश आहे.

तीन ऑफशोर कंपन्या गेल्या १३ वर्षांपासून अदानी समूहाच्या असूचीबद्ध (नॉन-लिस्टेड) उपकंपन्यांसोबत गुंतवणुकीचे अनेक व्यवहार करत असून विनोद अदानी या कंपन्यांशी लाभार्थी मालक किंवा संचालक म्हणून संबंधित असल्याचा दावा अहवालात करण्यात आला. अशा स्थितीत मार्केट नियामक सेबीने अदानी समूहाच्या शेअर्सच्या चौकशीचे वृत्त समोर आल्यापासून शेअर्समध्ये घसरण झाली. सेबी थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शनमधील अनियमितता आणि नियामक नियमांचे उल्लंघन या प्रकरणाची चौकशी करत आहे.

सोमवारी, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या बाजारात सूचीबद्ध १० पैकी ८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली तर दोन शेअर्सही लोअर सर्किटला धडकले. गेल्या सत्रात अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १.८९% घसरून १७१७ रुपये, अदानी ग्रीन एनर्जी ४.९६% घसरणीसह ८३७.४५ रुपये, अदानी पोर्ट्स ०.६५%, अदानी पॉवर ०.५५ टक्क्यांनी १९०.५५ रुपयावर घसरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here