Home मनोरंजन ट्विट करत स्वरांन पुन्हा सेन्सॉर बोर्डाचे कान पिळले.. म्हणाली भारताला खरं ..

ट्विट करत स्वरांन पुन्हा सेन्सॉर बोर्डाचे कान पिळले.. म्हणाली भारताला खरं ..

642
0

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा वादग्रस्त आणि तितकाच बहूप्रतिक्षित चित्रपट ‘ भिड ‘ हा २४ मार्चला रिलीज झाला आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘भिड’ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.हा चित्रपट रिलीज होताच चर्चेत आहे.
‘भिड’ हा चित्रपट रिलिज होण्यापुर्वीच बराच वादात होता. या चित्रपटाचं टिझर रिलिज झाल्यानंतर ते युट्युब वरुन हटवण्यात आलं त्यांनतर या चित्रपटातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणनही काढण्यात आले त्यानंतर या चित्रपटातील जवळपास 13 सीन सेन्सॉर बोर्डाने काढले आहेत.
आता या विषयी स्वरा भास्करनं एक ट्विट केलं आणि या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. स्वरा भास्कर नही याबाबत ट्विट केले आहे. स्वराने चित्रपटाच्या कट शॉट्सबद्दल ट्विट केले आहे, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटरवर हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिनं चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर झालेल्या वादानंतर कापण्यात आलेल्या सीन्सचा मुद्दा उपस्थीत करत निशाणा साधला आहे. स्वराने ट्विटमध्ये सेन्सॉर बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘भारताला वस्तुस्थितीची अ‍ॅलर्जी आहे’, असे तिनं म्हटले आहे.


स्वराच्‍या ट्विटला रिप्लाय देताना एका युजरने लिहीले की, मेकर्सना ओटीटीवर अनकट सीनसह चित्रपट रिलीज करू द्या.असं म्हणत तिची बाजू घेतली आहे तर अनेकांनी तिला या देशात इतक्या समस्या वाटतात तर तिनं हा देश सोडून निघुन जावं असा सल्ला तिला दिला आहे.याशिवाय अनेकांनी या ट्विटला स्वराचा नवा प्रचार असंही म्हटलं आहे.
अरुण दीप नावाच्या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर देताना स्वरा भास्करने हे ट्विट केले आहे. ज्यावर स्वराचे उत्तर आले आहे, त्या ट्विटमध्ये जमावाच्या त्या सर्व दृश्यांचा उल्लेख आहे जे चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहेत.
स्वरानं शेअर केलेल्या फोटोत, प्रमाणपत्र तपशीलाची एक प्रत आहे ज्यामध्ये 13 दृश्ये कापली गेली आहेत. यामध्ये पीएम मोदींच्या भाषणापासून ते कोरोना काळापर्यंतची तुलना स्वातंत्र्याच्या काळाशी करण्यात आली होती, या सर्वांचा उल्लेख आहे.
स्वरा भास्कर नेहमी तिच्या परखड वक्तव्यसाठी ओळखली जाते. नुकतच तिनं कॉग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या मुद्यावरही तिचं मतं व्यक्त केलं. ज्याची बरिच चर्चा रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here