Home अहमदनगर कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार काळेंचे एक पाऊल पुढे..

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार काळेंचे एक पाऊल पुढे..

20257
0

कोपरगाव : किसन पवार


कोपरगाव शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पाच नंबरचे साठवण तळे व शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारली तर मूळ दुखणेच गायब होऊ शकते हे कदाचित आमदार काळे यांच्या लक्षात आले असल्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून १२० कोटी १२ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाने ५ नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी आवश्यक असलेल्या १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी दिली असून याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी उद्या बुधवार (दि.२७) रोजी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे ही आ. आशुतोष काळे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे याबाबत आग्रही होतो. त्यासाठी आंदोलने केली आमरण उपोषण देखील केले मात्र सत्ता नसल्यामुळे माझे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे वचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समक्ष दिले होते. त्यावेळी त्यांनी देखील माझ्या निर्णयाला सहमती दिली होती. त्यामुळे निवडून येताच पहिल्या दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पवार साहेबांच्या मदतीने पूर्ण करू शकलो. या पाच नंबरच्या तलावातील माती मोफत उचलण्याचा कृत्रिम अडथळा दूर केला व त्यानंतर त्यास तांत्रिक मान्यता हा महत्त्वाचा टप्पा फार झाला असून या साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगाव करांना ही दिवाळी भेट ठरू शकते आणि त्यातून नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे तरीपण अद्याप आर्थिक तरतूद हा महत्त्वाचा भाग बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here