Home मनोरंजन ऐश्वर्याने शेअर केला “गुरु “च्या प्रीमियरचा १४ वर्ष जुना फोटो

ऐश्वर्याने शेअर केला “गुरु “च्या प्रीमियरचा १४ वर्ष जुना फोटो

28
0

मुंबई: ऐश्वर्या रे आणि अभिषेक बच्चन यांचा “गुरु “हा चित्रपटाला आज १४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्रामवर गुरु चित्रपटाच्या प्रीमियरचा वेळेचा फोटो शेअर करत १४ वर्ष जुन्या तिच्या आठवणी जागृत केल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक या फोटोंमध्ये आहेत. प्रेसशी बोलताना ऐश्वर्या निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिषेककडे पाहताना दिसली. चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम, बेज स्वेटर आणि ग्रीन जॅकेटमध्ये दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे, “या दिवशी … 14 वर्षे … गुरु कायमचे.”

तिच्या या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया मिळत आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. “विश्वातील सर्वात सुंदर स्त्री,”अश्या प्रतिक्रिया तिचे चाहते करत आहेत. “गुरु” या चित्रपटात अभिषेकने गुजरातमधील महत्वाकांक्षी व्यावसायिक म्हणून भूमिका साकारली आहे.ज्यात तो त्याची बायको ऐश्वर्या सोबत यश गाठतो. या चित्रपटात आर माधवन, विद्या बालन आणि मिथुन चक्रवर्ती यांनीही भूमिका साकारल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CJ9R7uzpBca/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here