Home क्रीडा पहिल्याच सामन्यातील महत्त्वाचा खेळाडू IPL 2023 मधून बाहेर

पहिल्याच सामन्यातील महत्त्वाचा खेळाडू IPL 2023 मधून बाहेर

245
0

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सीझन खूपच रोमांचक होत आहे. पण यावेळी यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागत आहे. या दुखापती इतक्या गंभीर आहेत की त्याचा त्यांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागू शकतो. आता केन विलियम्सननंतर सलग दुसरा खेळाडू १६ व्या मोसमातून बाहेर पडत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा स्टार गोलंदाज ज्याने त्यांना पहिल्या सामन्यात विजयाचा पाया रचून दिला होता. पण त्याच मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. RCB चे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध KKR vs RCB सामन्यादरम्यान ही माहिती दिली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी कोलकाता विरुद्धच्या सामन्यादरम्यान बोलताना सांगितले की, स्टार वेगवान गोलंदाज रीस टोपली आयपीएल २०२३ मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर रीस टोपली हातावर पट्टी बांधून दिसला. त्याच वेळी, प्रशिक्षकाने पुष्टी केली आहे की त्याची दुखापत अधिक गंभीर आहे आणि आता तो यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा खेळताना दिसणार नाही.’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून पराभव करत आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली चांगल्या लयीत होते. तथापि, पहिल्या सामन्यात आरसीबीसाठी एकच गोष्ट चांगली झाली नाही ती म्हणजे त्यांचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीची दुखापत. क्षेत्ररक्षण करताना त्याचा पाय मैदानात अडकला आणि तो पडला. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. तथापि, रीस १६ व्या हंगामातून बाहेर झाला आहे. त्याच्या बदलीची घोषणाही संघ लवकरच करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here