Home क्रीडा भारतीय संघाने केला “या ” खेळाडूचा सन्मान

भारतीय संघाने केला “या ” खेळाडूचा सन्मान

150
0

IND vs AUS : ऑस्ट्रेल्यावर तीन गाडी राखत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयामुळे भारताने गाबा मैदानावर सुवर्णक्षरात आपले नाव कोरले. या विजयात रिषभ पंतने अमूल्य योगदान करत ८९ धावांच्या जोरावर भारताला विजयी मार्गावर नेले. या ऐतिहासिक विजयाचे भारतभर आनंद साजरा करण्यात आला. पण आता भारतीय संघाचे अजून एका कारणाने कौतुक केले जात आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर भारतीय संघानं खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा खास सन्मान केला आहे. त्यामुळे अजिंक्य आणि टिमचं सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

सामन्यानंतर अजिंक्य रहाणेनं १०० वा सामना खेळणाऱ्या नॅथन लायन याला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी भेट देत त्याचा खास सन्मान केला. या प्रसंगाची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू इरफान पठाण आणि लक्ष्मण यांनी या कृतीचं स्वागत करत भारतीय टिमचं कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here