Home अर्थकारण ‘लेक लाडकी’ योजने अंतर्गत आता मुलींना मिळणार ७५ हजार रुपये!

‘लेक लाडकी’ योजने अंतर्गत आता मुलींना मिळणार ७५ हजार रुपये!

225
0

मुंबई : ‘लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची’ या ब्रीदावर चालविल्या जाणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजने अंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही योजना आता नव्या स्वरूपात आणली जाणार आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात आणत असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळू शकणार आहे. या अंतर्गत जन्मानंतर मुलीला ५००० रुपये मिळतील. मुलगी पहिलीत गेल्यानंतर ४००० रुपये तर सहावीत ६००० रुपये तर अकरावीत गेल्यानंतर ८००० रुपये मिळणार आहेत. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ७५,००० रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here