Home इतर जवानाची निर्घृण हत्या…!

जवानाची निर्घृण हत्या…!

81
0

मराठवाडा साथी न्यूज

सातारा : सातारा जिल्ह्यातील एका जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील सैदापूर येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान संदीप जयसिंग पवार हे गावी सुट्टीवर आले असता २७ डिसें.रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन त्यांना जखमी केले,असा बनाव रचला होता.त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान,जवानाच्या पत्नीने अज्ञात व्यक्तीविरोधात वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. त्यानुसार एलसीबी पथकाने घरातील नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा जवान संदीप पवार यांच्या हत्येमध्ये त्यांची पत्नी, भावजय आणि मेहुणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मयत संदीप पवार हे सुट्टीवर आल्यावर दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करत, मारहाण करत,वारंवार त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे.त्यांच्या त्रासाला कंटाळून २७ डिसेंबर रोजी सायंकाळी संदीप यांना घरात लाकडी कळकाच्या दांडक्याने मारहाण केल्याचे कुटुंबीयांनी कबूल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here