Home राजकीय पवार साहब हैं तो सब मुमकीन है

पवार साहब हैं तो सब मुमकीन है

394
0

ताई-भाऊ एकत्र
पवार हॅट््स ऑफ – पंकजा
पंकजा चांगले काम करते – शरद पवार

मराठवाडा साथी न्यूज । मुंबई
खडसेंच्या प्रवेशानंतर नाराज पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात ‘चक्रव्युहात’ अडकल्याचे म्हटले होते. त्या भाषणात त्यांनी अनेक संकेत दिले होते. त्यानंतर काल मुंबईत उसतोड कामगारांच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी तोडगा काढल्यानंतर पंकजा मुंडेंनी ज्या पद्धतीने पवारांचा कामाचा स्टॅमिना पाहून ‘हॅट््स आॅफ’ ही पंकजा मुंडेची प्रतिक्रिया अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंच्या कामाचे कौतुक केले. त्यालाही पार्श्वभूमी असल्याचीही बुधवारी दिवसभर चर्चा होती. तर ‘पवार है तो सबकुछ मुमकीन है’ अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

काय झाले पुण्याच्या बैठकीत?
पुण्यात ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक झाली. त्या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरु होती. तेही सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळेच शरद पवार हैं तो सब मुमकीन है, असेच सगळे म्हणत होते.
या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी शरद पवारांना हॅट्स ऑफ म्हणत कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे ट्विट केले आणि चर्चांना उधान आले. दसरा मेळाव्यातही पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. तरीही पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत? फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात, हे त्यांनी सांगितले.

पंकजा कुठे ? सेना की राष्ट्रवादीत
भाजपाला राज्यात उभारी देणाऱ्या खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा या देखील भाजपावर नाराज होत्या. यामुळे खडसेंनंतर मोठे पाठबळ असलेल्या पंकजा या शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरु होती. यातच पंकजांनी शरद पवारांचे कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आ. रोहित यांनीही मानले ‘ताईं’चे धन्यवाद
पंकजा यांच्या याट्विटवर पवारांचे आमदार नातू रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here